विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी या पेजवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार सर्व सत्राच्या सर्व युनिटच्या अभ्यासासाठी संबंधित विषयाच्या प्राध्यापकांनी स्वतः तयार केलेल्या आणि काही युनिट साठी युट्युब वरील तज्ञ शिक्षकांच्या ऑनलाइन अध्यापनाच्या व्हिडिओ लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहेत
यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमची विद्याशाखा म्हणजे Arts किंवा Science या टॅबवर क्लिक करा यानंतर त्या विद्याशाखेतील वर्गावर क्लिक करा जसे तुम्ही Arts टॅबवर क्लिक केल्यानंतर बीए फर्स्ट/ बीए सेकंड किंवा बीए थर्ड अशा टॅबवर क्लिक करा तुम्हाला त्या वर्गाची सर्व विषयांची एक यादी दिसेल
या यादीमध्ये प्रत्येक विषया समोर संबंधित वर्गाच्या दोन्ही सत्रासाठी CLICK हा शब्द लिहिलेला दिसेल त्यावर क्लिक केल्यावर एक पीडीएफ फाईल ओपन होईल
ज्यामध्ये अभ्यासक्रम व त्यासमोर व्हिडिओची यूट्यूब लिंक आपल्याला दिसेल तुम्हाला ज्या घटकाचा अभ्यास करायचा आहे त्याच्या समोरील लिंक वर क्लिक केल्यास तो व्हिडिओ पाहता येईल